चंद्रयान-3ः चंद्राबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Comments · 473 Views

चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिल

चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे.

आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही.

आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या क्लबमध्ये भारताचा चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवर चंद्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यानुसारच चंद्राशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

1. चंद्र गोल नाही

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसून येतो मात्र चंद्र हा एखाद्या चेंडूसारखा गोल नाही तर तो अंडाकृती आहे. तुम्ही चंद्राकडे पाहाता तेव्हा त्याचा काही भाग दिसून येतो

2. चंद्र कधीही पूर्ण दिसत नाही

तुम्ही जेव्हा चंद्र पाहाता तेव्हा तुम्हाला तो जास्तीत जास्त 59 टक्केच दिसून येतो. त्याचा उर्वरित 41 टक्के भाग पृथ्वीवरुन दिसत नाही.

3. ज्वालामुखी स्फोटाचा ब्लू मूनशी संंबंध

चंद्राशी संबंधित असलेला ब्लू मून हा शब्द 1883 साली इंडोनेशियातील क्राकाटोआ बेटावर झालेल्या ज्वालामुखी स्फोटामुळे वापरात आला असं म्हटलं जातं.

ज्वालामुखीच्या भीषण स्फोटांपैकी एक तो मानला जातो. काही बातम्यांनुसार त्याचा आवाज ऑस्ट्रेलियातील पर्थ आणि मॉरिशसपर्यंत गेला होता असं मानतात.

 

त्यानंतर वायूमंडळात इतकी राख पसरली की चंद्र निळा दिसू लागला. त्यानंतर हा शब्दप्रयोग वापरात आला.

4. चंद्रावर गुप्त प्रकल्प

एकेकाळी अमेरिका चंद्रावर अण्वस्त्राच्या वापराचा गांभीर्याने विचार करत होता. रशियावर आपली शक्ती दाखवून दबाव आणणे हा त्यामागचा हेतू होता.

या गुप्त मोहिमेला ए स्टडी ऑफ लूनार रिसर्च फ्लाइट्स आणि प्रोजेक्ट ए 119 असं नाव होतं.

5. चंद्रावर खड्डे कसे तयार झाले

ड्रॅगन सूर्याला गिळत असल्यामुळे सूर्य ग्रहण होतं अशी चीनमध्य़े कल्पना होती. याचा चिनी लोक शक्य तितका प्रसार करायचे.

इतकंच नव्हे तर चंद्रावर एक बेडूक राहातो तो चंद्राच्या खड्ड्यांत बसलेला असतो अशीही त्यांची कल्पना होती.

 

Comments